बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनापासून बचावासाठी WHO ने जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना!

मुंबई | जागतिक आरोग्य संघटनेने मेडिकल मास्क आणि फॅब्रिक मास्कच्या वापरासंदर्भात काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जेणेकरून तुम्हाला कोरोनाच्या विषाणूंपासूनअधिक संरक्षण मिळू शकेल. जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मेडिकल किंवा सर्जिक मास्कचा वापर आरोग्य कर्मचाऱ्यांनी करावा, असे म्हटले आहे. तसेच ज्या लोकांना कोव्हीडची लक्षणे जाणवत आहेत किंवा जे लोक कोरोना रुग्णांची देखभाल करत आहेत, अशा व्यक्तींसाठी सर्जिकल मास्क उपयुक्त आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय.

ज्या भागांमध्ये कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे आणि ज्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नाही, अशा ठिकाणी ज्येष्ठ व्यक्ती आणि सहव्याधी असणाऱ्या लोकांनी सर्जिकल मास्क घालूनच फिरावं. तसेच तुम्ही सार्वजनिक वाहतूक किंवा अन्य कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी काम करत असाल तर डबल मास्कचा वापर करणं केव्हाही चांगलं. मात्र तुम्ही एन-95 मास्क वापरत असाल तर तुम्हाला डबल मास्क वापरण्याची गरज नाही, असं WHO ने म्हटलंय.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांनुसार, ज्या व्यक्तींना कोरोनाची कुठलीही लक्षणे जाणवत नाही, त्यांनी फ्रॅबिक मास्कचा वापर करावा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतीत कर्मचारी, रेशन आणि गर्दीच्या ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींनी फॅब्रिक मास्कचा वापर केल्यास चालेल, असं WHO ने म्हटलं आहे. तसेच अमेरिकेतील CDC च्या अभ्यासानुसार, डबल मास्क परिधान केल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका 96.4 टक्क्यांनी कमी होतो.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

देशासाठी कायपण! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रतन टाटांनी उचललं आणखी एक महत्त्वाचं पाऊल

“उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं”

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती; 22 जणांचा मृत्यू

‘हा कठीण काळ आहे’; मालदीवमध्ये एन्जॉय करणाऱ्या सेलिब्रिटींवर श्रुती हासन भडकली

राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी ‘सीरम’ने जाहीर केल्या कोविशिल्ड लसीच्या किंमती

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More