मुंबई | दिवाळीनंतरही कोरोनाचा संसर्ग वाढतच राहिला तर, राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करणे अशक्यच राहील, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार करत होतो. मात्र, करोनाची वाढती परिस्थिती पाहता दिवाळीनंतर याची दुसरी लाट आली आणि संक्रमण वाढले तर आपल्याला दिवाळीनंतरही शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत, असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.
करोनाचे संक्रमण आतापेक्षा कमी झाले आणि आपल्याला वाटले की, शाळा सुरू करायला हरकत नाही. त्यावेळी त्या सुरू करता येतील, असंही बच्चू कडू म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
“आरेतील कारशेडचं ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून”
तेवतिया आणि वॉर्नरमध्ये नेमकं काय झालं?; सोशल मीडियावर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली”
…अन्यथा आपल्याला अनलॉकचा विचार सोडून द्यावा लागेल- राजेश टोपे