बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शेतकरी उद्धवस्त, उभी पीकं पाण्याखाली, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा”

औरंगाबाद | गेल्या आठवडाभरात औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने थैैमान घातलं आहे. आठवडाभरातच पावसाने होत्याचं नव्हतं करून टाकलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. कारण काढणीला आलेल्या पीकं वाहून गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. जलील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित औरंगाबादमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

शेतकरी बांधवांचं उभं पीक वाहून गेलं असून शेतात जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलं आहे. शेतात पाणी साठल्यामुळे मोठं मोठे खड्डे पडल्याचं दिसत आहे त्यामुळे त्या भागावर शेती करता येणं शक्य नाही. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं फारं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर औरंगाबादमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

ठाकरे सरकारमधील मंत्री, आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी यांनी पाहणी दौरा करुन नेहमीप्रमाणे फोटोसेशन केले. जिल्हाप्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन आठ ते दहा दिवसात शासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिलं होतं मात्र त्यांना आर्थिक मदत मिळाली का?, असा सवाल जलील यांनी केला आहे.

दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेले पिक वाया गेलं आहे. मूग, उडीद, मका, तुर, ऊस, भुईमुग पाण्याखाली गेले असून कपाशी आणि सोयाबीनसह इतर पिकांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही, असंही जलील म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! ठाण्यातील नर्सने कोरोनाऐवजी दिली रेबिजची लस अन् मग…

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्रातील ‘या’ 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

मरावे परी कीर्तीरूपे उरावे! ब्रेन डेड असूनही मुलाने वाचवले 7 जणांचे प्राण, आरोग्यमंत्रीही अंत्यसंस्काराला हजर

आमदार सुहास कांदेंना धमकीचा फोन, छगन भुजबळांनी उचललं हे मोठं पाऊल!

अरे मारतो का आता! अन् थोडक्यात बचावला दिनेश कार्तिक, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More