इम्रान खान तिसऱ्यांदा बोहल्यावर, पहा कोण आहे नववधू!

कराची | पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तनी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी तिसऱ्यांदा विवाह केला. आध्यात्मिक गुरु बुशरा मेनका यांच्यासोबत इम्रान खान यांनी लग्नाची गाठ बांधली.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. पीटीआय पक्षाने अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून शुभेच्छा दिल्या. आध्यात्मिक गुरु बुशरा मेनका यांच्याकडे इम्रान खान आध्यात्माचं शिक्षण घ्यायला जात होते.

इम्रान खान यांनी 1995 साली जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याशी पहिले लग्न केले होते. त्यानंतर  2015 मध्ये टीव्ही प्रेझेंटर रेहम खान हिच्याशी विवाह केला होता.

bushra maneka - इम्रान खान तिसऱ्यांदा बोहल्यावर, पहा कोण आहे नववधू!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या