Imran Khan Divorce l अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान सध्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता इम्रान खानचा अवंतिका मलिकपासून 2021 मध्ये घटस्फोट झाला आहे. अशातच आता इम्रान खानने तब्बल ५ वर्षानंतर उघडपणे खुलासा केला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे.
इम्रानने गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनचे केले कौतुक :
बॉलीवूड अभिनेता इम्रान खानने अवंतिका मलिकपासून घटस्फोटाबाबत स्पष्टपणे बोलून दाखवले आहे. त्याला अवंतिकाचा पाठिंबा मिळाला नसल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच तो एकटाच अंतर्गत संघर्षाचा सामना करत होता. यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी आणखी काही बोलायचे नसल्याचेही इम्रानने स्पष्ट केले आहे. बऱ्याच दिवसांपासून अभिनयातून ब्रेक घेतलेल्या इम्रान खानने त्याची पहिली पत्नी अवंतिका मलिकबद्दल सांगितले आहे. अशातच त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनचेही त्याने कौतुक केले आहे.
इम्रान एका मुलाखतीत म्हणाला की, ‘त्या भागात जास्त न जाता, मी गॉसिपच्या आगीत जास्त भर घालत नाही. तसेच मी या सर्व ओझ्याशी आणि माझ्या अंतर्गत संघर्षांशी झगडत व हाताळत होतो, म्हणून मी घटस्फोट केला आहे. तसेच त्यावेळी मला समजले की माझे लग्न आणि माझे नाते मला मदत करत नाही म्हणून मी तो निर्णय घेतला होता.
Imran Khan Divorce l इम्रान-अवंतिका फेब्रुवारी 2019 पासून विभक्त :
इम्रान एका मुलाखतीत इम्रान म्हणाला होता की, ‘माझे लेखा वॉशिंग्टनशी प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत. मी घटस्फोटित आहे आणि फेब्रुवारी 2019 पासून वेगळे राहत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे 2019 मध्ये अवंतिका इमरानचे घर सोडून गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्यांच्या घटस्फोटाची पुष्टी झाली नव्हती.
मात्र आता अवंतिका आणि मी 2019 पासून वेगळे राहत आहोत. मात्र त्यांचा घटस्फोट 2021 मध्ये झाला आहे. 2021 मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला असला तरी दोघे नक्कीच वेगळे राहत होते. सध्या इम्रान लेखाला डेट करत आहे. लेखासोबत त्याची सुरुवातीची डेटिंग लॉकडाऊन दरम्यान झाली होती.
News Title – Imran Khan On Divorce With Avantika Malik
महत्त्वाच्या बातम्या-
तुला पाहिजे तेवढे पैसे घे; कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट
मनोज जरांगे विरोधात ‘त्या’ तरुणाने असं काय केलं?…म्हणून बसला बेदम चोप
मासिक पाळीदरम्यान ‘या’ अभिनेत्रींना होतो प्रचंड त्रास; केली मोठी मागणी
कॅशबॅकपासून बिल भरण्यापर्यंत, या 4 बँकांनी बदलले क्रेडिट कार्डचे नियम; काय परिणाम होणार?