“…म्हणून अमेरिकेला ओसामा बिन लादेनचा खात्मा करता आला”

वॉशिंग्टन | आमच्यामुळे अमेरिकेला ओसामा बिन लादेनचा खात्मा करता आला, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. ते अमेरिकेतील ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
पाकिस्तानी गुप्तहेर ‘आयएसआय’ संस्थेने अमेरिकेला गुप्तवार्ता दिली होती. त्यामुळे अमेरिका पाकिस्तानामध्ये ओसामा बिन लादेनचा शोध घेऊ शकली, असं इम्रान खान यांनी सांगितलंय.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांच्यात व्हाईट हाउसमध्ये झालेल्या चर्चेनंतर एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं होतं.
दरम्यान, व्हाईट हाउसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पाकिस्तानला देण्यात येणारी संरक्षण मदत पुन्हा सुरू करण्याबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आला नसल्याचं समजतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“सरकार आपल्या फायद्यासाठी माहिती अधिकार कायद्यात बदल करतंय”
-खासदार अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादी काँग्रेस सोपवणार मोठी जबाबदारी?
-पक्षाची बदनामी टाळण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांच्या विनयभंगाकडे भाजपचं दुर्लक्ष?
-पहिल्याच भाषणात कार्यकर्त्याला रडू कोसळलं; अन् सावरायला सरसावले धनंजय मुंडे
-तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी!