Loading...

‘ईट का जवाब पत्थर से देंगे’; इम्रान खान यांचा भारताला इशारा!

नवी दिल्ली | भारताला धडा शिवकवण्याची वेळ आली आहे. युद्धासाठी आमचं लष्कर तयार आहे, अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिली आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यादिनानिमित्त इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमध्ये बोलत होते.

भाजप आणि नरेंद्र मोदींचा खरा चेहेरा समोर आला आहे. आता पाकिस्तानची लढाई एका विचारधारेविरोधात असून ही विचारधारा भयंकर आहे, असं म्हणत इम्रान खान यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Loading...

काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय भारताला महागात पडणार आहे. सगळ्या जगाचं लक्ष काश्मीरकडे लागलं आहे. आता काश्मीरमध्ये काय घडतं ते पाहाच, असा इशारा इम्रान खान यांनी दिला आहे.

दरम्यान, भारत सहिष्णू देश समजला जात होता.  मात्र सध्या जी विचाराधार जे सरकार सत्तेत आहे त्यामुळे सर्वात जास्त नुकसान भारताचं होणार आहे, असं इम्रान खान म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“220 चा आकडा पार करण्यासाठी नगरमध्ये आता 12 विरूद्ध शून्यची लढाई”

-माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या भावाला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

Loading...

-…म्हणून ‘ते’ मला कधीही गोळ्या घालू शकतात- असदुद्दीन ओवैसी

-पवार म्हणतात… जर असं केलं तर अलमट्टीवर कायमस्वरूपी तोडगा निघेल!

Loading...