इस्लामाबाद | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. भारतासोबतचे संबंध चांगले करण्याची इच्छा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानातील जिओ टीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.
इम्रान खान यांनी पंतप्रधान झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे तसेच सर्व मतभेद बाजूला करुन भारतासोबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दोन्ही देशातील नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणि प्रादेशिक विकासासाठी सोबत येऊन काम करण्याची गरज आहे, असं इम्रान खान यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी इम्रान यांच्या या पत्राला काय उत्तर देणार हे महत्त्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘रॉकस्टार’ अमृता फडणवीस; लॉस एंजेलिसमध्ये जलवा!
-‘विंचू’ वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरुर यांना जामीन मंजूर
-पाटीलकी मिरवणाऱ्यांना शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला
-राष्ट्रवादी भाजपला मदत करते, त्याऐवजी या पक्षाला सोबत घ्या; काँग्रेसच्या बैठकीत मागणी
-विश्वचषक स्पर्धेमुळे पूनम पांडे पुन्हा चर्चेत, केला ‘हा’ फोटो शेअर
Comments are closed.