Imtiaz Jaleel | मनुस्मृतीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र याला राज्यातून विरोध होताना दिसत आहे. याला समता परिषदेने विरोध केला. यावेळी आता जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मात्र अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाटलं गेलं.
जितेंद्र आव्हाडांच्या कृत्याने राजकीय वातावरण तापलं
आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील ही चूक झाली. यामुळे आता राज्यातील राजकारण हे तापलं आहे. विरोधकांनी आव्हाडांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड (Imtiaz Jaleel) यांची पाठराखण केली आहे.
जितेंद्र आव्हाड (Imtiaz Jaleel) हे चांगल्या भावनेने महाडला गेले होते. त्यांच्या हातून चुकून फोटो फाटला गेला. त्यांनी यानंतर माफी देखील मागितली आहे. आपण यामागची त्यांची भावना देखील समजून घ्यावी, असं तरी मला वाटतं, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यानंतर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलिल यांनीही आव्हाडांचीच बाजू घेतली आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या कृतीवर इम्तियाज जलिल काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड (Imtiaz Jaleel) आमचे विरोधक असले तरीही ते कृत्य हे नजरचुकीने झालं आहे. याप्रकरणात आता बाऊ केला जात आहे. यामागे काहीतरी षडयंत्र आहे. शालेय अभ्यासक्रमांमध्ये मनुस्मृतीच्या विचारांचा धडा आणणं कितपत योग्य आहे?, असा सवाल आता जलिल यांनी केला आहे.
जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले तेव्हा शाळेतील शेजारच्या मुलांना माहिती पडलं की माझ्या शेजारी बसणारा मुलगा हा कोणत्या जातीचा आहे. जातीपातीचे शिक्षण आपण अभ्यासक्रमात आणत आहोत हे किती दुर्दैव आहे, असं इम्तियाज जलिल म्हणाले आहेत.
आपण याविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन भूमिका घेतली पाहिजे. जर जातीपातीचं राजकारण होणार असेल तर आपली पुढील पिढी कुठे जाईल याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे, असंही ते म्हणालेत.
News Title – Imtiaz Jaleel On Jitendra Awhad About Dr. Babasaheb Ambedkar Photo Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
अडचणीत सापडलेल्या आव्हाडांची छगन भुजबळांकडून पाठराखण, म्हणाले…
बाप, आज्यानंतर आता आईही अडचणीत; आईच्या रक्ताची चाचणी होणार
‘गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा’; अजित पवारांचं अंजली दमानियांना उत्तर
गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट झाली, लावणीला डाग लागला- डॉ. चंदनशिवे
मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल, हवामान विभागाने दिली मोठी अपडेट