बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विकेंड लॉकडाऊनला खासदार इम्तियाज जलील यांची केराची टोपली; कव्वाली कार्यक्रमात पैशांची उधळण

औरंगाबाद | लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि प्रशासनाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या औरंगाबादच्या खासदारांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी विकेंड लॉकडाउन असताना देखील प्रशासनाचे नियम पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपूर्वी महिला सरकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी इम्तियाज जलील हे नाव चर्चेत आलं होतं.

सध्या औरंगाबाद शहरामध्ये कोरोनाचा नवा डेल्टा प्लस हा विषाणू डोकं वर काढत असल्याने प्रशासनातर्फे वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. पण खुद्द खासदारांकडूनच या नियमांची पायमल्ली होत असल्याचं दिसून आलं. खासदार इम्तियाज जलील हे विकेंड लॉकडाऊन असताना देखील एका कव्वालीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. शिवाय या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर पैशांची उधळण होत असल्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे व्यासपीठावर असून काही लोक त्यांच्यावर नोटांची उधळण करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी आता कोरोना नियमांना हरताळ फासल्याचं पाहायला मिळत आहे.

जलील यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल झाल्यामुळे खासदार इम्तियाज जलील हे सरकारवर चांगलेच कडाडले होते. आता या प्रकरणात प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More