आमचाही राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही – इम्तियाज जलील
मुंबई | काँग्रेसने एमआयएम भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप वारंवार केला आहे. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
आमचा राजकीय पक्ष आहे. बिहार निवडणुकीत 300 जागांपैकी 20 जागा जरी लढवल्या नाही तर कसं चालेल? आम्ही काय फक्त भाषण करायची का? निवडणूक लढवायची नाही का? आम्ही काही गोट्या खेळत नाही ना, असा खोचक प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
नाचता येईना अंगण वाकडे अशी एक म्हण आहे. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पराभूत होतं त्या त्या ठिकाणी कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायला हवं. म्हणून एमआयएम भाजपची ‘बी टीम’ असल्याचं म्हणायचं आणि नंतर जबाबदारी झटकायची. पराभव झाला तर लगेच काँग्रेसवाल्यांना ओवैसी दिसतात, असा टोलाही जलील यांनी काँग्रेसला लगावला आहे. लोकमतच्या महाराष्ट्रीय ऑफ द इयर या कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, शिवसेनेसोबत आमची युती झाली याचा अर्थ त्यांच्या विचारसरणीशी आम्ही जुळवून घेतलंय असं नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही कोणासोबतही युती करायला तयार आहे. भाजपला सत्तेतून बाहेर ठेवून देशाला वाचवणं हाच आमचा उद्देश आहे, असं जलील यावेळी म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
रघुराम राजन यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र, म्हणाले…
10 वर्षाच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हीही सुन्न व्हाल
नितेश राणेंनी माझ्यावर केलेले सर्व आरोप सिद्ध करावेत, अन्यथा…- वरूण सरदेसाई
…असं काही झालं आणि 2 फुटी अजीम मन्सुरींसाठी वधूंची रांग लागली; ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल!
ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर; वाचा काय सुरू, काय बंद?
Comments are closed.