बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत खैरे जळक्या वृत्तीचे, इम्तियाज जलील चंद्रकांत खैरेंपेक्षा चांगले खासदार”

मुंबई | औरंगाबादमध्ये येत्या काही महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता औरंगाबादेत आरोप प्रत्यारोपाचं वारं वाहू लागलं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगताना दिसू लागलं आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंंत्री रावसाहेब दानवे यांनी रूग्णालयात असताना पैशाचं वाटप केलं आहे. त्यांनी पैसे वाटल्यामुळेच माझा पराभव झाला असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यानंतर आता सेना भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू होणार हे स्पष्ट दिसू लागलंय.

भागवत कराड यांना मीच नगरसेवक केलं, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होतं. मीच भागवत कराडांना महापौर केलं असून त्यांच्यापेक्षा मी मोठा नेता आहे. त्यामुळे त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. मराठवाडा हा शिवसेनाचा बालेकिल्ला असून भाजपला मराठवाड्यात जिंकू देणार नाही, असा इशारा खैरेंनी दिला होता. त्याला आता भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत खैरे जळक्या वृत्तीचे आहेत. त्यांनी औरंगाबाद शहराची वाताहात केली. चंद्रकांत खैरेंची भागवत कराडांसोबत तुलना करणं सोडाच पण, एमआयएमचे इम्तियाज जलील देखील त्यांच्यापेक्षा चांगले खासदार आहेत, अशी टीका प्रशांत बंब यांनी केली आहे. तर औरंगजेब आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी औरंगाबादला खिळखिळं करून सोडल्याचंही ते म्हणालेत.

दरम्यान, मी दिल्लीत भेटायला गेलो असताना मी करांडाना भेटलो नाही, कारण माझ्याकडे वेळ नव्हता. मी त्यांच्यापेक्षा सिनिअर आहे. ते येतील मला भेटायला, असंही खैरे यांनी म्हटलं होतं. ज्या दानवेंनी मला पाडलं त्या दानवेंना काय शुभेच्छा द्यायच्या, असं देखील खैरे यांनी म्हटलं होतं. निवडणुका जवळ येत असल्यानं आता सेना विरूद्ध भाजप असा औरंगाबादमध्ये सामना रंगताना दिसतोय.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले चक्क कंडोम!

“महाराष्ट्रातील पेटत्या मशालींचे चटके दिल्लीस बसताच 127 व्या घटनादुरुतीचं पाऊल पडलं”

धोकादायक! डेल्टा प्लस व्हेरिएंटचा मुंबईत पहिला बळी

‘खासदाराने माझा गळा आवळला’, मार्शलांचा गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

“मंत्री यशोमती ठाकूर यांनी 800 कोटींचा घोटाळा केला”

‘अगर आप करते रहेंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा’; आठवलेंचा विरोधकांना काव्यमय इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More