बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राम राज्याची आस्था दाखवून खिसे भरण्याचं काम चालू आहे – इम्तियाज जलील

औरंगाबाद | अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा गैरव्यवहार समोर आला होता. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता. राम मंदिरासाठीच्या भूखंडाचा हा घोटाळा बाहेर आल्यानं देशभर एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता या विषयावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर टीका केली आहे.

देवाच्या घरासाठी कोट्यवधींचा निधी जमा झाला आहे. तो कुठून आला, याचा हिशोब विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि पंतप्रधान मोदी यांनी द्यावा. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाच्या नावावर प्रचार करत, राम राज्य येईल, असं स्वप्न दाखवलं होतं. आता खिसे भरण्याचं काम केलं जातं आहे, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे.

राम मंदिर वादाच्या जमिनीवरच आहे. त्या ठिकाणी मस्जीद असल्यानं आम्ही मंदिर तिथे होऊ नये, यासाठी विरोध केला होता. मात्र, आम्ही न्यायालयाचा आदर करत असून त्यांनी दिलेला निर्णय मान्य केला. त्यात अशा पद्धतीने मंदिराच्या नावावर जर काही लोक स्वतःचा फायदा करून घेत असतील तर हे चुकीचे आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले.

दरम्यान, पुण्यातील एका मोठ्या शैक्षणिक संस्थेने 21 कोटींचा निधी मंदिरासाठी दिला आहे. याबाबत आश्चर्य वाटत असून सध्या देशाला शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयाची नितांत गरज आहे. मंदिर-मस्जीद अशा धार्मिक गोष्टींसाठी समाजाचे लोक निधी जमा करतील. शैक्षणिक संस्थांनी त्याबाबत निधी का द्यावा? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मंत्री बच्चू कडू यांच्या यूट्यूब चॅनेलला मिळाले मानाचे सिल्व्हर प्ले बटन

धक्कादायक! कुंभमेळ्यात तब्बल एवढे लाख कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट बनावट

“…म्हणून मुस्लिम समाजातील लोक कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत”

एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक

“राममंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More