बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंविरोधात अरेतुरेची भाषा सहन करणार नाही- इम्तियाज जलील

औरंगाबाद | शिवसेना आणि आमचा पक्ष आम्ही एकमेकांचे विरोधक आहोत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अरे-तुरेची भाषा सहन करणार नाही, अशा शब्दात औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अभिनेत्री कंगणा राणावतला सुनावलं आहे.

एका राज्याच्या मुख्यमंत्र्याविरोधात अशी भाषा वापरणं योग्य नाही, अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांबद्दल वापरणे केव्हाही अस्वीकारार्ह आहे, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

कंगणाने दिलेल्या आव्हानाप्रमाणे कंगणा मुंबईत आल्यावर काय होणार?, याकडे अवघ्या राज्याचंच काय तर दिल्लीतील नेत्यांचंही लक्ष होतं. त्यानंतर कंगणा येण्यापूर्वी महापालिकेने तिच्या कार्यालयावर कारवाई केली होती. कंगणाने हे सर्व पाहिल्यावर तिने व्यक्त केलेला संताप यामध्ये कंगणाने मुख्यमंत्र्यांवर टीका करताना केलेल्या एकेरी उल्लेखाने कंगणावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. याच पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी कंगणाला सुनावलं आहे.

दरम्यान, सध्या या प्रकरणावर शिवसेनेने पडदा टाकला असून आम्ही सर्व विसरलो असल्याचं शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंगणाची क्रांतिकारक भगतसिंग यांच्याशी तुलना; ‘या’ अभिनेत्यानं केलं ट्विट

घरी बसून महिलांना फावल्या वेळात काम करण्याची संधी मिळणा

पुणे, मुंबईच्या वैद्यकीय प्रवेशाचा कट ऑफ वाढणार!

पुण्यातील तात्पुरत्या कारागृहातून 2 कोरोनाबाधित कैद्याचं पलायन

बालिका वधू फेम सुरेखा सिक्री यांची प्रकृती चिंताजनक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More