फक्त भाजप सत्तेत येऊ नये त्यासाठी कोणासोबतही युती करण्याची तयारी- इम्तियाज जलील
औरंगाबाद | अमरावती महानगरपालिकेत स्थायी समीतीच्या सभापती निवडणुकीत एमआयएम आणि शिवसेनेने युती केल्याची माहिती समोर आली आहे. यावर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देशातून भाजपला हद्दपार करायचं असून देशाचं होत असलेलं नुकसान वाचवायचं आहे. यासाठी आम्हाला कोणासोबतही युती करण्याची वेळ आली तरी चालेल आम्ही करू, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
वरिष्ठ स्तरावरील नेत्यांचा काही विषय नसतो. विकास कामे करत असताना कुणाची मदत घेऊ शकतो, याचा विचार स्थानिक पातळीवरील नेते करत असतात. अमरावतीच्या या निवडणुकीत स्थानिक नेत्यांना शिवसेनेची मदत घेणं योग्य वाटलं असेल जेणेकरून विकासकामे करता येतील. हा निर्णय केवळ त्या अनुषंगाने झाला असल्याचं जलील म्हणाले. यावेळी जलील यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्येही अशाच प्रकारंच चित्र दिसणार आहे का असा सवाल करण्यात आला.
दरम्यान, आम्ही निवडणुका स्वतंत्र लढणार आहोत. औरंगाबाद तर आमचा गड आहे त्यामुळे तिथला तर विषय येत नसल्याचं जलील यांनी सांगितलं. मात्र शिवसेना आणि एमआयएमने युती केली यावरून शिवसेनेवर टीका होत आहे.
थोडक्यात बातम्या-
गरीब मुलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या धनश्रीची मृत्यूशी झुंज, अनेकांनी केलं मदतीचं आवाहन!
‘या’ शहराने केला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्टर प्लॅन
पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण
जॉनी बेयरस्टोला वॉशिंग्टन सुंदर भिडला, भर मैदानात ‘राडा’, पाहा व्हिडिओ
Comments are closed.