बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचं नामांतर होऊ देणार नाही, गरज पडल्यास रस्त्यावर उतरू”

औरंगाबाद | औरंगाबादचे संभाजीनगर करावं अशी मागणी ठाकरे सरकार सत्तेत असताना करण्यात आली होती. हा प्रस्ताव मंत्रिमडळात रखडलेला होता. अचानक एकनाथ शिंदेनी बंड पुकारलं आणि राजकारणच बदललं. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूरी दिली. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

इतक्या गडबडीत राजीनामा देण्याआधी प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. हे नामांतर संभाजीराजेंवर प्रेम असल्याने नाही तर खुर्ची वाचवण्यासाठी  केलं गेलं. राज्य सरकार कोसळण्याची शक्यता दिसू लागली होती. त्यामुळे एक भावनिक आणि राजकीय खेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खेळली. त्यांना अशी भिती होती नवीन सरकार नांमातर करून स्वत: त्यांचं श्रेय घेईल, असा हल्लाबोल एएमएमआयचे खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

जगभरात औरंगाबादची ऐतिहासिक ओळख आहे. केवळ हिंदुुत्व हा मुद्दा दाखवण्यासाठी ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. कोणाच्याही आजोबांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी औरंगाबाद नामांतर होऊ देणार नाही. आम्हाला संभाजी महाराजांचा आदर नक्की आहे. त्यांच्या नावाला आमचा विरोध नाही. तुम्हाला नाव द्यायचं असेल तर पुणे (Pune) शहराला द्या, असं आव्हान जलील यांनी ठाकरेंना दिलं.

औरंगाबादच्या नामांतराचा विरोध अनेकांनी नोंदवला होता. काही काँग्रेस (Congress) नेत्यांनी यामुळे राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीच्या काही नेत्याचाही याला विरोध होता. जलील यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, यावेळी काही महत्वाचे ठराव घेण्यात आले. यासंबधी आम्ही रस्त्यावर उतरू. कोर्टात उतरू, असं ते यावेळी बोलत होते.

थोडक्यात बातम्या

‘देवेंद्र मध्यरात्री वेश बदलून…’; अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

लहान मुलांसाठी LIC ची भन्नाट योजना; दररोज 150 रूपये गुंतवणूक केल्यास मिळतील ‘इतके’ लाख

शीर धडावर हवंय ना?, अयोध्येतील साधूची लीना मणीमेकलाईना धमकी

“शिंदे-फडणवीसांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील उधारीचा माल”

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीबाबत महत्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More