Top News औरंगाबाद महाराष्ट्र

…तर औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आम्ही साथ देऊ- इम्तियाज जलील

Loading...

औरंगाबाद | औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर होईल असं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यावर भाष्य केलं आहे. येत्या चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवा. त्यानंतर नाव बदलण्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ, असं ते म्हणाले आहेत.

औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करु असं शिवसेना आणि मनसे म्हणत आहे. मात्र, या दोन्ही पक्षांना माझा सल्ला आहे. आधी शहराच्या विकासाकडं लक्ष द्या. संभाजी महाराज हे महापुरुष होते. शहराचा विकास कराल तर नाव बदलण्यासाठी आम्ही साथ देऊ, असं ते म्हणाले आहेत.

Loading...

औरंगाबादचं नाव कधीही संभाजीनगर होऊ शकतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही औरंगाबादचं नाव संभाजीनगर करून महाराष्ट्राला सरप्राईज देतील, असं मोठं वक्तव्य शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. त्यामुळे शहराच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्यात गैर काय? असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

भारत भेटीला येणाऱ्या ट्रम्पंना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहतीये भिंत

विद्यार्थिनींनी घेतली प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ; पंकजा मुंडे संतापल्या

महत्वाच्या बातम्या-

Loading...

छत्रपतींच्या जीवन प्रवासावर आधारित ‘शिवसृष्टी’ उभारण्यात येईल; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

शपथविधी सोहळ्याला केजरीवालाचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण

“अशी फाटक्या झोळीला ठिगळे लावण्यापेक्षा मोदीजी जरा इकडे बघा…”

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या