औरंगाबाद महाराष्ट्र

“भाजपचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत, त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का?”

औरंगाबाद | सुप्रीम कोर्ट, सीबीआय, लोकसभा आणि पार्लमेंटवर विश्वास आहे. पण याच संस्था धोका देत असतील तर काळजी करण्याची वेळ आली आहे. पीडितेच्या घरच्यांना भेटू नाही दिलं म्हणजे हे गुंडाराज आहे, अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

हाथरस गावातील पीडितेला औरंगाबाद शहरात एमआयएमच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली. औरंगाबाद चौकात एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत कँडल पेटवून श्रद्धांजली दिली. यावेळी इम्तियाज जलील बोलत होते.

देशात जे सुरू आहे ही येणाऱ्या काळाची झलक आहे. भाजपचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत. त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का?, असा सवालही जलील यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाबाधित रूग्णांना नातेवाईकांशी संवाद साधता यावा यासाठी मुंबई पालिका खरेदी करणार ‘इतके’ टॅब

“…तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता, हाथरस प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?”

महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत?- अमोल कोल्हे

आरोपींना फासावर लटकवायला हवं- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या