आता इम्तियाज जलीलांना फक्त ओवैसींच्या आदेशाची प्रतिक्षा!

औरंगाबाद |  माझी लोकसभा लढण्याची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. फक्त एमआयएमचे अध्यक्ष असदुद्धीन ओवैसी यांच्या आदेशाची वाट पाहत आहे, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. ते ‘थोडक्यात न्यूज’शी बोलत होते.

ओवैसी साहेबांचा आदेश आल्यास मी 100 टक्के लोकसभा लढणार, असंही जलील म्हणाले.

चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेकडून औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी निश्चित आहे. त्यांच्याविरोधात जलील एमआयएमकडून लढणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीने बी.जे. कोळसे पाटलांना औरंगाबादची उमेदवारी जाहीर केली होती मात्र एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे त्यांनी माघार घेतली असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-

…’याच’ कारणासाठी चेन्नईचा संघ आगळा वेगळा ठरतो!

-माढ्याचे उमेदवार विजयसिंह मोहितेच होते पण त्यांनी फोनच उचलला नाही, अजित पवारांनी केला गौप्यस्फोट

धक्कादायक! काँग्रेसचे हे दोन दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादी खेळतीय एकत्र होळी… ते ही मनसे कार्यालयात!

NSSO ने मोदी सरकारचा बुरखा फाडला! 5 वर्षात 2 कोटी पुरूष बेरोजगार झाले….