बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदीजी, कागदपत्रं मागायला याल तर कब्रस्तानातील माझ्या पूर्वजांची माती देईन”

मुंबई | नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच धारेवर धरले आहे. मी याच मातीत जन्मलो आणि याच मातीत दफन होईन, असं म्हणत त्यांनी घणाघाती टीका केली आहे.

मोदीजी, ज्या दिवशी मला कागदपत्रं मागायला येतील, त्या दिवशी मी त्यांना माझे वडील आणि आजोबांना ज्या ठिकाणी दफन करण्यात आले होते त्या कब्रस्तानात घेऊन जाईन. तेथील माती त्यांना देईन आणि सांगेन हिच माझी कागदपत्रं आहेत, असं जलिल म्हणाले आहेत.

दिल्लीतील शाहीन बागेत सध्या मुस्लिम महिलांचे सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरु आहे. याविषयी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. जलील मुंबईतील एका सभेत बोलत होते.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात वातावरण तापलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य इतर विरोधी पक्षांनी यावरुन भाजपवर जोरदार टीका केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

दिल्लीत भाजपच्या प्रचारासाठी गेलेल्या विनोद तावडेंना केजरीवालांचा दणका!

“सीएएविरोधात प्रस्ताव आणण्याचा कोणताही विचार नाही”

महत्वाच्या बातम्या-

अटीतटीच्या लढतीत भारताचा सनसनाटी विजय; पाहा सुपर ओव्हरचे दोन षटकार!

जेव्हा नारायण मूर्ती रतन टाटांच्या पाया पडतात

24व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार; मोदी सरकारचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More