बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विकासाच्या नावावर उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही”

औरंगाबाद | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहन करण्यात आलं. यावेळी आज ज्याने ज्याने मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले, त्यांना मला सांगायचं आहे की आमचा विकास आता सुरु झाला आहे, आणि अजून खूप होणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

शहरात विकास कामं झाली नसल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच विकासाच्या नावावर शिवसेना आता औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी भाषण देऊन स्पष्ट केलं की शिवसेना पक्ष, माजी खासदार आणि 14 कर्तृत्वान महापौरांनी मागच्या 30 वर्षांपासुन ते आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा विकास न करता फक्त औरंगाबादकरांची फसवणुक केलेली आहे, असं जलील म्हणाले.

दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केल्यानंतर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली. तसंच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यासाठी योजनांचा पाढा वाचवून दाखवत मुख्यमंत्र्यांनी एमआयएमला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

थोडक्यात बातम्या-

“पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, असा शब्द मोदींनी दिला तर…”

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता!

‘वयाची 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलंय’; अजित पवारांचा काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला टोला

‘या’ ठिकाणी ट्रक चालकांना मिळतो तब्बल 70 लाख पगार!

‘अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता, कट्टरतावाद कायम राहिला तर…’;, नरेंद्र मोदींनी तालिबानचे सांगितले धोके

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More