बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहरूख खानसोबत तुलना म्हणजे सन्मानाची गोष्ट- कार्तिक आर्यन

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या ‘लव आजकल’ या चित्रपटाच्या माध्यमातून बराच चर्चेत आहे. या चित्रपटात  कार्तिक आर्यन आणि सारा अली खान मुख्य भुमिकेत दिसणार आहे. ‘लव आजकल’चे दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्याकडून शाहरुख खानसोबत तुलना करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे, असं कार्तिक आर्यनने म्हटलं.

इम्तियाज अली यांनी कार्तिकची मेहनत, मदतीचा स्वभाव याचं तोंडभरून कौतुक करत त्याची तुलना शाहरुख खानसोबत केली. यासंदर्भात बोलताना कार्तिकनं म्हटलं की शाहरुख खानसोबत काम केलेल्या दिग्दर्शकाकडून अशी स्तुती ऐकणं म्हणजे एक प्रशंसेचीच गोष्ट आहे.

‘किंग ऑफ रोमांस’ यांच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही आणि मी स्वत: ला त्यांच्या बरोबर समजतही नाही, असंही कार्तिक आर्यननं म्हटलं.

कार्तिक आर्यनने ‘लव आजकल’ चित्रपटासाठी इम्तियाज अली यांचे आभार मानले. सारा अली खान हिने साधारण वर्षभरापूर्वी हिंदी कलासृष्टीत पदार्पण केलं. केदारनाथ या चित्रपटामागोमाग तिने इतरही काही चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली.

ट्रेंडिंग बातम्या –

“बजरंगबलीमुळे जिंकलात, आता शाळेत-मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकवा”

BSNLचा धमाका; 96 रुपयात महिनाभर रोज मिळणार 10GB 4G डाटा

बारामती शहराने मिळवला आणखी एक मान!

महत्वाच्या बातम्या –

मंत्र्यांच्या बंगल्यांवर सरकारकडून कोटींची उधळपट्टी; थोरात, भुजबळांच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च

म्हणून मलायकाशी लग्न करण्यास अर्जुन करतोय टाळाटाळ

2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना टॅक्स, शिक्षण, नोकरीमध्ये सवलत नाही? शिवसेनेकडून विधेयक सादर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More