औरंगाबाद महाराष्ट्र

संसदेत दुष्काळावर भाषण अन् विजयी रॅलीत हजारो लिटर पाण्याची नासाडी!

औरंगाबाद | एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची रविवारची विजयी रॅली चांगलीच वादात सापडली आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांनी मिरवणुकीदरम्यान केलेली हजारो लिटर पाण्याची नासाडी!

जलील यांच्या समर्थकांनी निळ्या आणि हिरव्या रंगांची उधळण केली. पण त्याबरोबरच हजारो लिटर पाण्याची नासाडी देखील केली. यावरूनच त्यांच्यावर आता चहूबाजूने टीका करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी संसदेत महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळावर जोरदार भाषण केलं. त्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. मात्र मराठावाड्यात भीषण दुष्काळ असताना एवढ्या पाण्याची नासाडी का केली जातेय? असा प्रश्न औरंगाबादकरांना पडला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे पराभूत खासदार चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या प्रकारावर आता जलील काय स्पष्टीकरण देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मलायका म्हणते… ‘कबूल किया मैंने उसको और उसके प्यार को!’

फारूख अब्दुल्ला म्हणतात, आम्ही भारतीयच पण…

-गिरीश महाजन देशातील मोठे नेते आहेत- संजय राऊत

-काँग्रेसला मोठा धक्का… ‘या’ नेत्याने दिला राजीनामा; करणार भाजपत प्रवेश

मनसेची ‘ही’ भूमिका आग्रही; पण आम्हाला मान्य नाही- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या