बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आधीही असंच घडलं होतं! 6 वर्षापूर्वी ‘त्या’ अपघातात बिपीन रावत थोडक्यात बचावले होते

नवी दिल्ली | भारताचे सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS General Bipin Rawat) यांचे हेलिकाॅप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे. तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकाॅप्टर कोसळले त्यामध्ये बिपीन रावत यांच्या पत्नी, संरक्षण साहाय्यक, सुरक्षा कंमांडो तसेच आयएएफ पायलट यांच्यासोबत 14 लोक हेलिकाॅप्टरमध्ये होते. या हेलिकाॅप्टर दुर्घटनेत बिपीन रावत यांच्यासह 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

याअगोदर 2015 मध्ये बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टरचा अपघात झाला होता. ही घटना 3 फेब्रुवारी 2015 रोजी घडली होती. बिपीन रावत यांची 2016 मध्ये सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिपीन रावत हे देशातील पहिले सीडीएस आहेत. नागालॅंड येथील दिमापूर येथील लष्कराच्या तीन कॉपर्स मुख्यालयाचे प्रमुख होते. त्यावेळी बिपीन रावत यांनी चित्ता हेलिकाॅप्टर दिमापूर सोडलं होतं.

त्यानंतर मात्र, उंचीवर गेल्यावर हेलिकॅप्टरचे नियंत्रण सुटलं आणि हेलिकॅप्टर जमीनीवर कोसळलं. या अपघातात इंजिनामध्ये बिघाड झाल्याने हेलिकाॅप्टर कोसळल्याचं सांगण्यात येत होतं. या अपघातातून बिपीन थोडक्यात बचावले होते. बिपीन रावत यांना काहीप्रमाणात जखम झाली होती.

दरम्यान, 2015 साली हेलिकाॅप्टर कोसळल्याने लष्कराकडून अधिकृत निवेदनात हेलिकाॅप्टर जमिनीपासून काही उंचीवर उडाल्याचे सांगण्यात आलं होतं. सिंगल इंजिनामध्ये गडबड झाली तसेच दोन्ही वैमानिकांचे नियंत्रण सुटलं होतं. या कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती. तरीदेखील या हेलिकाॅप्टर अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

किंग कोहलीला डच्चू! रोहित शर्मा टीम इंडियाचा नवा कर्णधार

“खरंच प्रायश्चित्त करायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…”

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ मोठे निर्णय; वाचा एका क्लिकवर

बिपीन रावत यांचं निधन, राष्ट्रपतींचा दौरा रद्द तर पंतप्रधान मोदींनी बोलवली महत्त्वाची बैठक

मोठी बातमी! हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS जनरल बिपिन रावत यांचं निधन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More