बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही”

जळगाव | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जळगाव दौऱ्यावर आहेत. मोदी सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याचे दहन नाना पटोले यांच्या उपस्थितीत फैजपूर या ऐतिहासिक भूमीतील धनाजी नाना महाविद्यालयात करण्यात आलं. तसेच मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

सत्ता ही लोकांच्या सुरक्षेसाठी असली पाहिजे, दुराचारासाठी नाही. पण भाजपने ज्या पद्धतीने देशात दुराचार माजवला आहे. त्या विरोधात आज सामान्य जनता तसेच काँग्रेसजन अशा सर्वांच्या मनात आग पेटली आहे. उद्या ही आग बाहेर आली तर भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत पटोलेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

भाजपच्या विरोधात कोणत्याही प्रकारची आघाडी काँग्रेस शिवाय होऊच शकत नाही. काँग्रेस पक्ष हा युपीएचे हृदय आहे. जर कोणताही विरोधी पक्ष तिसरा मोर्चा काढायला गेला तर त्याचा सरळ फायदा भाजपला होईल, हे आता सर्वांना कळलं आहे. त्यामुळे काँग्रेसला सोडून अशी तिसरी आघाडी होणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, पाशवी बहुमताच्या आधारावर मोदी सरकार देशाची आर्थिक व्यवस्था, शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांना संपवण्याचं काम करत आहे. हे लोक बघत आहेत. या अत्याचारी सरकारची 5 वर्षे संपण्याची वाट देशातील जनता पाहत आहे. 2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करु’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

लॉकडाउनमुळे रिचार्ज न करू शकणाऱ्यांना ‘या’ कंपनीकडून मिळणार मोफत रिचार्ज!

महाविकास आघाडीत ठिणगी?, भुजबळ तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेणार!

अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का; निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची शिवसेनेला टाळी

“परीक्षेला जाताना जसं लहान मुलांच्या पोटात दुखतं तसं महाविकास आघाडीचं झालंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More