Shocking: स्वप्नात दिसलं असं काही की दुसऱ्याच दिवशी तीनं केलं बाॅयफ्रेंडसोबत ब्रेकअप
मुंबई | सोशल मीडियावर दररोज काही ना काही गोष्टी घडत असतात. अशातच सोशल मीडियावर एक गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे, ज्याचा तुम्ही कधीही विचार देखील केला नसेल. एका तरूणीला तिचा बॉयफ्रेंड चिटींग करत असल्याचं सतत वाटत होतं. त्यावरून तिला एक रात्री स्वप्नं देखील पडल्याचं पहायला मिळालं.
जॅमी आपल्या बॉयफ्रेंडसोबत बऱ्याच कालावधीपासून रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही वेगळे राहत होते, त्यामुळे काही दिवसांपासून जॅमीला थोडं वेगळं वाटत होतं. प्रियकरासोबत असूनही तो तिच्यापासून दूर आहे असं तिला जाणवत होतं. आपला बॉयफ्रेंड आपल्याला फसवतो आहे, आपल्यासोबत चीटींग करतो आहे, त्याचं दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत अशी गट फिलिंग निर्माण झाली होती.
एकेरात्री अशा फिलिंग्समुळे तिला अचानक जाग आली आणि पहाटे 4 वाजताच ती आपल्या बॉयफ्रेडच्या घरी गेली. जॅमी तिच्या गट फिलिंग्सवर विश्वास ठेवून बॉयफ्रेडच्या घरी पोहचली. तिच्याकडे घराच्या चाव्या असल्यामुळे तीने डोअर बेल न वाजवता किंवा दरवाजा न ठोकता स्वत:च घरात घुसली. तेव्हा तिथं तिला जे काही दिसल ते पाहून तिला धक्काच बसला. तिचा बॉयफ्रेंड दुसऱ्या महिलेसोबत एकाच बेडवर झोपला होता. जॅमीनं त्याचा फोटो काढला आणि तिथून गुपचूप निघून गेली. त्यानंतर तिनं तो फोटो त्याला पाठवला आणि ब्रेकअप केला.
दरम्यान, जॅमीला बऱ्याच दिवसांपासून आपला बॉयफ्रेंड आपल्याला फसवत आहे असं वाटत होतं. पण तिच्याकडेे पुरावा नसल्यानं ती काहीच करू शकत नव्हती. गट फिलिंग्समुळे तिनं आपल्या चिटर बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडलं.
थोडक्यात बातम्या-
31 मार्चच्या आत पूर्ण करा ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा फटका
मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हरभजन सिंगची राजकारणात एन्ट्री?; AAP कडून मोठी ऑफर
‘तुला ऍडमिट करुन टाकू, गडबड नको’; शिवसेना नेत्याची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या आजचे ताजे दर
Comments are closed.