बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुंतवणूकदार मालामाल! अवघ्या काही मिनिटांत ‘हे’ दोन शेअर्स उसळले

मुंबई | कमी वेळात जास्त पैसे कमवणे, तसेच पैसे गुंतवून दुप्पट पैसे कमवण्याचा सोपा मार्ग म्हणजे ‘शेअर मार्केट’. शेअर मार्केटमध्ये फक्त मोठे उद्योगपती नव्हे तर अनेक तरुण देखील पैसे गुंतवतात. अशातच आज 7 ऑक्टोबर रोजी टाटा समूहच्या दोन शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली असून गुंतवणूकदार काही मिनिटांतच मालामाल झाले आहेत.

आज टाटाच्या शेअर्समधील टायटन आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे टाटाच्या या दोन्ही कंपन्यांमध्ये प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांनी मोठी गुंतवणूक केली आहे. .

टायटनचा शेअर दुपारी 1ः15 वाजता 10.62 टक्क्यांच्या वाढीसह 2375 रुपयांवर व्यवहार करत होता. ट्रेडिंगवेळी त्याने 2378 रुपयांची पातळी गाठली, जी 52 आठवड्यांचा नवीन रेकॉर्ड आहे. किमान पातळी 1154 रुपये आहे. त्याची बाजारमूल्य 2,10,520 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. TCS नंतर टाटा समूहाची ही दुसरी कंपनी आहे, ज्यांचे बाजारमूल्य 2 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

दरम्यान, टाटा मोटर्समध्येही 11 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे. यावेळी शेअर 11.16 टक्क्यांच्या वाढीसह 373 रुपयांवर पोहचला होता. ट्रेडिंगवेळी हे शेअर्स 383 रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते, जे त्याची 3 वर्षांची सर्वोच्च पातळी आहे. टाटा मोटर्स कंपनीचे बाजारमूल्य 1.24 लाख कोटी रुपये आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 25 किलोमीटरसाठी वापरलं हेलिकॉप्टर

‘गर्दी वाढवण्यासाठी आम्हाला जबदस्तीने बोलवलं’; योगी आदित्यनाथांच्या कार्यक्रमातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

बाॅलिवूड स्टार ह्रतिक रोशनचा आर्यन खानला पाठिंबा, पोस्ट शेअर करत म्हणाला…

”या’ स्टारकास्टनंतर आता शाहरूखही एनसीबीच्या निशाण्यावर’; सरकारमधील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य!

‘सोमय्या भ्रष्टाचाराची तक्रार करायला निघाले तर त्यांना…’; शेलारांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More