बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् क्षणात भलं मोठं घर कोसळलं, पाहा केरळमधील थरारक व्हिडीओ

तिरुवनंतपुरम | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना देखील पूर आले आहेत. अशातच केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. यादरम्यान, केरळमधील एक भलं मोठं घर पाण्यात बुडालं. याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

शनिवारपासून केरळमध्ये सुरु असलेल्या पावसाने 24 जणांचा बळी घेतला आहे. यावेळी कोट्टायम जिल्ह्यातील कुट्टिक्कल इथं भूस्खलनामुळे एक घर थेट पाण्यात कोसळलं. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. बघता- बघता संबंधित भलमोठं घर पाण्याच्या प्रवाहांमध्ये कोसळलं.

या दुर्घटनेत संबंधित घरातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील तिघांचे मृतदेह काल स्थानिक लोकांनी बाहेर काढले. तर उर्वरीत तिघांचे मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले आहेत.

दरम्यान, केरळमध्ये मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाल्याने बचावकार्य सुरु आहे. यासाठी लष्कराच्या तुकड्या देखील पोहोचल्या आहेत. तसेच रविवारी पाऊस कमी झाला तरी भारतीय हवामान विभागाने 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलं आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“यंत्रणांच्या धाडीमुळे महाराष्ट्र कधीच मागे हटणार नाही, तो अशा गोष्टींसमोर झुकत नाही”

“सरकारची प्रतिमा जपण्यासाठी सर्वांना समोर येऊन बोलावं लागेल, हे 8 दिवसात पळून जातील”

मोठी बातमी! दिवाळीनंतर ठाकरे सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता

अन् कुत्र्यानेही धरला ठेका, कुत्र्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More