बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोंबड्या चोरुन नेल्याची अफवा, पुण्यात आरोपीनं केला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार

पुणे | पुण्यात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच वारजे-माळवाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन जणांनी मिळून एकावर कोयत्याने सपासप वार केल्याचा काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानं परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

यातील मुख्य आरोपीचं नाव सचिन खैरे असं आहे. सचिन याने प्पूल्या आणि शुभम टेम्पो या दोघांसोबत मिळून संदिप खैरे या व्यक्तीवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी गणपतीची आरती करताना गणेश खैरे आणि सागर बराटे यांच्यामध्ये भांडण झालं होतं. यावेळी संदिपने त्यांना यावेळी समजून सांगितलं होतं. दरम्यान, संदिपच्या कडकनाथ कोंबड्या आरोपी सचिन खैरे याने चोरून नेल्याची अफवा संदिपने दत्तनगर परिसरात पसरवली असल्याचा गैरसमज सचिनला झाला होता.

दरम्यान, पसरलेल्या अफवेवरुन आरोपीने थेट दत्तनगर परिसर गाठला. तिथं जाताच संदीपची पत्नी आणि नातेवाईक मधे आले. मात्र आरोपींनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी संदिपवर कोयत्याने सपासप वार केले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची माहिती संदिपनेच वारजे पोलिसांना दिली. संबंधित प्रकार हा रविवारी रात्री झाला असून वारजे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. तसेच संदिपने मुख्य आरोपी सोबत इतर दोन जणांविरुद्ध देखील तक्रार नोंदवली आहे.

थोडक्यात बातम्या-

पत्नी आणि मुलीसाठी सुट्टी मिळाली नाही; पोलिस अधिकाऱ्याचा बेधडक निर्णय

आईला कोरोना, बेड मिळेना, मात्र मुलगा आणि मुलीनं हार मानली नाही; एका धैर्याची कहाणी!

“हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालबाहेरचे?, टाळी एका हाताने वाजत नाही”

शेजारील तरुणासोबत पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचं समजल्यानंतर पतीने उचललं धक्कादायक पाऊल

कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल तूर्तास रद्द, पुढील सामन्यांवर नंतर होणार निर्णय!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More