Top News विदेश

मोदींपाठोपाठ ट्रम्प यांचाही चीनला मोठा झटका, अमेरिकेत देखील टिकटॉकवर बंदी!

नवी दिल्ली |   भारतापाठोपाठ अमेरिकेने देखील चीनविरोधात उघड भूमिकी घेतली आहे. चीनी अ‌ॅप असलेल्या टिकटॉकवर अमेरिकेने बंदी आणली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तशी घोषणा केली आहे.

सुरक्षेचा धोका लक्षात घेता आम्ही टिकटॉकवर बंदी घालत आहोत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत टिकटॉकवरच्या बंदीची घोषणा करत त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

भारताने केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेत चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी बंदीची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

दरम्यान,  भारत-चीनच्या संर्घषानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत चीनच्या 59 अ‌ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉकसह अनेक लोकप्रिय अ‌ॅप्सचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या-

चिमुरड्यांवर काळाचा घाला! भरधाव वेगानं जाणारा पिकअप चिरडून गेला अन…

कोरोनानं ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या छातीत झालीय बुरशी; कोरोनाचं धक्कादायक वास्तव!

देशात कोरोनाचा हाहाकार, कालच्या दिवसातली धक्कादायक आकडेवारी….

“माझ्याबद्दल फार वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत” रिया चक्रवर्तीचा भावुक व्हिडीओ व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या