बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ॲलोपॅथी-आयुर्वेद वाद पुन्हा पेटला?; रामदेव बाबांनी IMAला खुलं पत्र लिहुन विचारले ‘हे’ प्रश्न

नवी दिल्ली | योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोना मृत्यूमागे ॲलोपॅथी औषधोपचार कारण असल्याचं मागे सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर रामदेव बाबा यांनी वक्तव्य घेतलं होतं. मात्र, अजुनही हा वाद कमी होताना दिसत नाही. आता रामदेव बाबा यांनी आयएमएला एक खुलं पत्र लिहलं आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशननं रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून आक्रमक पवित्रा घेत रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी वाद थांबवला असला तरी आता रामदेव यांनी पुन्हा एकदा आयएमए आणि फार्मा कंपन्यांना टार्गेट केलं आहे. त्यात त्यांनी आयएमएला काही प्रश्न विचारले आहेत.

त्यातील काही महत्वाचे प्रश्न –

1. उच्च रक्तदाब, मधुमेह या समस्यांवर ॲलोपॅथीकडे कायमस्वरुपीचे काय उपचार आहेत?

2.थायरॉईड, आर्थरायटिस, कोलायटिस आणि दमा यांसारख्या आजारांवर औषध तयार करणाऱ्या फार्मा कंपन्यांकडे कायमस्वरुपी औषधं आहेत का?

3. ॲलोपॅथीला 200 वर्षे झाली असतील तर या उपचार पद्धतीमध्ये फॅटी लिव्हर, लिव्हर सोरायसिस, हेपॅटायटिस आणि क्षयरोग हे आजार कायमस्वरुपी बरे करणारे उपचार आहेत का?

4.फार्मा इंडस्ट्रीकडे हृदयातील ब्लॉकेजेस संपवण्याची औषधं आहेत का?

5. विना बायपास शस्रक्रिया, विना शस्त्रक्रिया आणि अँजिओप्लास्टी टाळण्यासाठी काही कायमस्वरुपाची औषधं आहेत का?

6. विना पेसमेकर हृदयाचं कार्य सुरळीत चालावं यासाठी या क्षेत्राकडं कुठले उपचार आहेत?

7. कोलेस्ट्रॉल आणि किडनी संबंधी साईड इफेक्टवर ॲलोपॅथीमध्ये काय उपचार आहेत?

8. जर व्यक्ती खूपच हिंसक, क्रूर आणि हिंस्र पद्धतीनं वागत असेल तर त्याला माणसात आणण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये काय उपचार आहेत?

9. तसेच एखाद्या व्यसनी व्यक्ती नशा करत असेल तर त्याला यातून बाहेर काढण्यासाठी काही कायमस्वरुपाचे उपचार आहेत का?

10. ॲलोपॅथी आणि आयुर्वेद यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी फार्मा कंपन्यांकडे कोणतं औषध आहे का?

11. विना ऑक्सिजन सिलेंडर रुग्णाच्या शरीरात ऑक्सिजन वाढवण्याचे फार्मा कंपन्यांकडे कोणतं औषध आहे?

12. ॲलोपॅथी औषध कंपन्यांकडे कोरोना रुग्णांना विना ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन क्षमता वाढवण्यासाठी उपाय आहेत का?

13. उच्च रक्तदाबासाठी काही प्रभावी औषध आहे का?

14.‘ॲलोपॅथीत टाइप-1 आणि टाइप-2 डायबिटीजवर कायमस्वरुपी औषध आहे का?’

15. इनलार्ज हार्ट आणि ईएफ कमी होण्यासाठी विना पेसमेकर काही उपाय आहे का?

16. डोकेदुखी, मायग्रेन यावर काही ठोस उपाय आहे का?

17. हार्ट ब्लॉकेज रिव्हर्स करण्यासाठी काय उपाय आहे का?

18. शस्त्रक्रियेशिवाय रोज माणसाचं वजन अर्धा किलो कमी होईल असं औषध आहे का?

19. माणसाला लागलेलं ड्रग्सचं व्यसन सोडण्यासाठी काही औषध आहे का?

असे प्रश्न बाबा रामदेव यांनी उपस्थित केले आहेत. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात आयएमएच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि बाबा रामदेव यांच्यात चांगलीच वादाची चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी हे पत्र ट्विट केलं आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लहान मुलांना होतोय कोरोनाचा संसर्ग; तब्बल 166 मुलं कोरोनाबाधित

टुलकिट प्रकरणाला नवं वळण; दिल्ली पोलिसांची ट्विटर इंडियाला नोटीस

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात एका दिवसात आढळले फक्त 94 कोरोनाबाधित रुग्ण

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

मुंबईत आमदाराच्या पत्नीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ, ‘हे’ दिलं कारण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More