बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भर कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारींनी काढला महिलेचा मास्क; पाहा व्हिडीओ

पुणे | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात देखील मोदींच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आमंत्रित केलं होतं. मात्र, कोश्यारी यांनी या कार्यक्रमात केलेल्या एका कृतीमुळे कोश्यारी यांच्यावर राज्यभरातून टीका होताना दिसत आहे.

राज्यपाल कोश्यारी पुण्यात नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या एका सायकल राॅलीच्या शुभारंभासाठी आले होते. त्यावेळी राज्यपालांच्या हस्ते सायकल चालकांचा सत्कार करण्यात आला. कोश्यारी यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आलेल्या एका महिलेला कोश्यारी यांनी पुणेरी टोपी घातली. त्यानंतर फोटो काढण्यासाठी कोश्यारी यांनी महिलेनेच्या तोंडावरील मास्क स्वत:च्या हाताने खाली ओढला. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.

कोरोनाच्या संकटात सर्वांनी मास्क घालणं गरजेचं आहे. त्यावेळी कोश्यारी यांनी देखील मास्क घातला होता. मात्र, केवळ फोटो काढण्यासाठी महिलेच्या तोंडावरील मास्क स्वत:च्या हातानं काढणं कितपत योग्य आहे, असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या कृतीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल महामहिम आहेत. त्यांनी काही केलं तरी मी त्यावर बोलू शकत नाही. त्यांनी शपथ घेताना तोंडावरचा मास्क काढण्यास सांगितलं तर आम्हाला मास्क काढावाच लागेल, असं अजित पवार म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

‘2024 ला पण तुम्हीच पंतप्रधान…’; अभिनेत्री कंगणा राणावतच्या मोदींना खास शुभेच्छा

‘…म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य केलं’; नाना पटोलेंची भाजपवर जहरी टीका

बीडमधील ह्रदयद्रावक घटना, कोरोनामुळे पतीच्या निधनानंतर पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल!

“दानवे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष होते, तेव्हा सर्व काही सुरळीत होतं”

ऐनवेळी आली ‘ती’ गुप्त खबर अन् पाकिस्तानात असलेल्या न्यूझीलंडने घेतला परतण्याचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More