बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भरबैठकीत नाना पटोले संतापले; ‘या’ मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीवर व्यक्त केली नाराजी

मुंबई | महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून सरकार पाच वर्ष टिकणार नाही, अशी टीका विरोधकांकडून सतत केली जात होती. अशात सरकारमधील वाद वारंवार चव्हाट्यावर येताना दिसत आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमधील वाद समोर आला आहे.

आगामी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने केली होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीला विरोध केला आहे. निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेत्यांची एक महत्वाची बैैठक आज विधानसभेत पार पडली. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानभवनाच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उर्जामंत्री नितीन राऊत, कॅबिनेट मंत्री सुनिल केदर यांच्यासह इतरही आमदार उपस्थित होते. यात राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या भूमिकेवर नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर या अधिवेशनात नाही तर पुढील अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार आहे, अशी माहिती आहे.

दरम्यान, या अधिवेशनाचे फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पुढील अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते किंवा बिनविरोध अध्यक्ष निवडला जाऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू

ममता बॅनर्जींना मोठा झटका! ‘इतक्या’ आमदारांनी तृणमूल काँग्रेसला रामराम करत केला भाजपमध्ये प्रवेश

कोरोनाकाळात देशातील 10 हजार कंपन्या बंद; महाराष्ट्रातील आकडा पाहून व्हाल थक्क!

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण!

एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या दोन तरूणांनी उचललं धक्कादायक पाऊल!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More