बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एप्रिल-मे मध्ये होईल कोरोना कहर; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे धक्कादायक निष्कर्ष!

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर देशभरात पाहायला मिळत आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’नं एक अंदाज व्यक्त केला आहे, ज्यामध्ये देशात कोरोना बाधितांची संख्या कोटींमध्ये वाढत जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या संशोधकांनी व्यक्त केलेल्या अंदाजामुळे सध्या चिंतेचं वातावरण पसरलं आहे. एप्रिल-मे महिन्यामध्ये 1.4 कोटी कोरोनाबाधित रुग्ण देशभरात होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. 15 एप्रिलनंतर कोरोना हा झपाट्याने वाढू शकतो आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 7.5 लाखांहून अधिक होऊ शकते असं संशोधकांनी सांगितलं.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे प्राध्यापक शशि कुमार आणि दिपक यांनी मे महिन्याच्या अखेरीस रुग्ण संख्या ही 20 लाखांपर्यंत पोहचू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे तसेच कोरोना लसीकरणाचा वेग वाढवून जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण जर केलं आणि लोकांनी याबाबत निष्काळजीपणा न करता नियमांचं पालन केलं तर, रुग्णसंख्या नक्कीच आटोक्यात येऊ शकते. असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात एका दिवसात 89 हजार 129 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून 714 जणांचा एकाच दिवसात कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतातील कोरोना पुन्हा एकदा उसळलेल्या राज्यांमध्ये पहिले राज्य महाराष्ट्र असून त्यापाठोपाठ कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, पंजाब आणि मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश होतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सध्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे काही दिवसात आरोग्य यंत्रणाही अपुरी पडण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, नागरिकांनी नियमांचं पालन करून आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावं.

थोडक्यात बातम्या – 

“महाराष्ट्राच्या लाॅकडाऊनला विरोध करणाऱ्या आनंद महिंद्रांनी मोदींच्या लाॅकडाऊनमध्ये मात्र थाळ्या पिटल्या”

एक हात गळ्यात दुसरा छातीवर; पतीला कल्पनाही नव्हती की पत्नीच्या डोक्यात काय शिजतंय!

बाॅलिवुड स्टार अक्षय कुमारला कोरोनाची लागण

‘ही’ गोष्ट करा तुम्हाला संचारबंदीचा त्रास होणार नाही, पोलिसांनीच दिला शब्द

विठुरायाच्या दर्शनासाठी आता कोरोना टेस्ट बंधनकारक नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More