बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता शहरातले मॉल्स देखील बंद राहणार!

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका तसंच नगरपालिका क्षेत्रातील माॅल्स बंद ठेवण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये भर पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

मॉल्समध्ये होणारी गर्दी टाळावी, लोकांनी गर्दी करू नये म्हणून शासनाने हे पाऊल उचलल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच 31 मार्चपर्यंत हे निर्देश दिले गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हे निर्देश तात्पुरते असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे कोरोना विषाणू महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फोफावला असून आता कोरोना रूग्णाची संख्या आता तब्बल 26 वर पोहोचला आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनारूग्ण असल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. ही महाराष्ट्रासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका तसंच नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासजी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘चासकमान’साठी भूसंपादन चुकीच्या पद्धतीने; पवारांची पुनर्वसनमंत्र्यांशी चर्चा

“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”

“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”

महत्वाच्या बातम्या-

‘चासकमान’साठी भूसंपादन चुकीच्या पद्धतीने; पवारांची पुनर्वसनमंत्र्यांशी चर्चा

#CoronaVirus : षटकार तर मारला आता चेंडू कोण शोधणार? 😂

कोरोना गो हा टिंगल-टवाळीचा विषय नाही, तो एक प्रतिमात्मक नारा- रामदास आठवले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More