भाजपला मोठा धक्का, 2 मंत्री आणि 8 विद्यमान आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी!

इटानगर |  लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे. अरूणाचल प्रदेशमधील भाजपच्या 2 मंत्री आणि 8 विद्यमान आमदारांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

भाजपला रामराम ठोकलेल्या आमदारांनी नॅशनल पिपल्स पार्टीत प्रवेश केला आहे. निवडणूकीचं तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष जारपूम गामलिन, गृहमंत्री कुमार वाय, पर्यटन मंत्री जारकर गामलिन या प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडला आहे.

दरम्यान, अरूणाचलमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकाही पार पडणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानण्यात येतोय.

महत्वाच्या बातम्या-

…आणि टीव्हीवरील चर्चेदरम्यान भाजप-राष्ट्रवादीचे नेते भिडले, पाहा व्हीडिओ

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; आता ही महिला नेता करणार भाजपत प्रवेश?

-राष्ट्रवादीला धक्का, अखेर रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला भाजपमध्ये प्रवेश!

कालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला!

मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा!