पठ्ठ्या एक लाख रूपये किलोनं विकतोय ‘ही’ भाजी; वाचा देशात कुठे होतंय उत्पादन
पाटणा | आपण दररोज बाजारात भाजी खरेदी करायला जातो. काही भाज्या स्वस्त असतात तर काही भाज्या शंभरीच्या घरात असतात. शेतमालाच्या उत्पादनावरून त्याची बाजारी किंमत ठरत असत असते. पण कोणाला कधी 1 लाख रूपये किलोनं भाजी विकताना पाहिलंय का? होय, बिहारच्या औरंगाबाद जिल्हात एक शेतकरी एक किलो भाजी चक्क एक लाखांनी विकतोय.
बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्हात राहणाऱ्या अमरेश सिंग नावाचा शेतकरी ‘हाॅप शूट्स’ भाजीची शेती करतो. या भाजीचा उपयोग आधी औषध तयार करण्यासाठी होतं होता, मात्र आता याचा उपयोग जेवणात खाण्यासाठी केला जात आहे. असं मानलं जातं की या भाजीचा उपयोग शरिरातील कॅन्सर सेल्स मारण्यासाठी केला होतो. हाॅप शूट्सच्या गुणधर्मांमुळे ही भाजी चांगल्या प्रकारे परिणामकारक आहे.
हाॅप शूट्सच्या फुलांना हाॅप कोन्स म्हणतात. या फुलांचा उपयोग महागड्या बियर तयार करण्यासाठीही केला जातो. तर या हाॅप शूट्सच्या फांद्याचा उपयोग जेवणात केला जातो. ही भाजी आतापर्यंतची सर्वात महागडी भाजी समजली जाते. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी या बद्दल ट्विट केल्यानंतर या भाजीची प्रसिद्धी सगळीकडे होत आहे.
आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, हाॅप शूट्सही जगातील सर्वात महागडी भाजी आहे. औरंगाबाद जिल्हात राहणाऱ्या अमरेश सिंग नावाचा शेतकरी ‘हाॅप शूट्स’ या भाजीची शेती करतो. अशा प्रकारची शेती करणारे ते भारतातील पहिलेच शेतकरी आहेत. अशा प्रकारची शेती ही भारतासाठी गेमचेंजर ठरू शकते, असं साहू म्हणाल्या.
पाहा ट्विट-
One kilogram of this vegetable costs about Rs 1 lakh ! World’s costliest vegetable,’hop-shoots’ is being cultivated by Amresh Singh an enterprising farmer from Bihar, the first one in India. Can be a game changer for Indian farmers 💪https://t.co/7pKEYLn2Wa @PMOIndia #hopshoots pic.twitter.com/4FCvVCdG1m
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) March 31, 2021
थोडक्यात बातम्या-
BCCI चा उद्धटपणा; विराट कोहलीने केलेल्या त्या टीकेला BCCI चं प्रत्युत्तर
धक्कादायक! मुलानं आत्महत्या केली तिथेच आईनेही आयुष्य संपवलं
अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचं कॅनडामध्ये निधन!
पुणे पोलिसांचा ‘मोक्का पॅटर्न’; 175 गुन्हेगारांवर केली धडक कारवाई
“नरेंद्र मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाला”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.