बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औरंगाबादेत PSI आणि महिला हवालदाराचं सूत जुळलं, पत्नीसोबत केलं लज्जास्पद कृत्य

औरंगाबाद | औरंगाबादेत एक अतिशय लाजिरवाणी घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या शैलेश जोगदंड याने हवालदार असलेल्या आपल्या प्रेयसीसोबत मिळून पत्नीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं पीएसआय पती आणि हवालदार असलेल्या त्याच्या प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शैलेश जोगदंड हा देवगाव रंगारी येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. त्याचं लग्न काहीवर्षांपूर्वीच झालं आहे. मात्र, तरीसुद्धा त्याचे औरंगाबाद पोलीस पथकात कार्यरत असलेल्या एका 29 वर्षीय हवालदार महिलेसोबत प्रेमसंबंध होते. शैलेश जोगदंड याचे आपल्या बायकोसोबत काही ना काही कारणावरून वारंवार वाद होत असे.

हवालदार असलेली प्रेयसी शुक्रवारी शैलेश जोगदंड याच्या घरी आली. यावेळी शैलेश आणि त्याची प्रेयसी या दोघांनी मिळून शैलेशच्या पत्नीला बेदम मारहाण केली. हवालदार प्रेयसीनं घरात तोडफोड सुद्धा केली. यावेळी पीडित महिलेनं मी पोलिसांत तक्रार दाखल करेल असं म्हणताच शैलेश जोगदंड याने पुन्हा तिला मारहाण करण्यास सुरवात केली.

दरम्यान, घटनेनंतर पीडित महिलेनं दुपारच्या वेळी पती शैलेश जोगदंड आणि त्याची प्रेयसी या दोघांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत दोघांच्या विरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी पीएसआय शैलेश आणि त्याची प्रेयसी असलेली हवालदार तरुणी या दोघांनाही तडकाफडकी निलंबित केलं आहे.

थोडक्यात बातम्या

ब्ल्यू फिल्मसारखं कर नाहीतर… पत्नीने पोलिसांना सांगितला धक्कादायक प्रकार

‘देवेंद्र फडणवीसांना अटक करा’; रुपाली चाकणकरांची मागणी

पुण्यात नग्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

“बनावट रेमडेसिवीर प्रकरणात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता”; भाजप आमदाराच्या ट्विटनं खळबळ

‘तो दारु पिऊन दिवसभर वावरात पडलेला असतो’; भाजपच्या ‘या’ आमदारावर गायकवाडांची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More