महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

अयोध्येला छावणीचं स्वरूप; शाळा महाविद्यालयांना सुट्टी

लखनऊ | संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल उद्या शनिवारी सकाळी साडे दहा वाजता लागणार आहे. त्यापार्श्वभूमीवर अयोध्येत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने अयोध्येला छावणीचं स्वरुप आलं आहे.

उत्तर प्रदेशात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला असून देशातील अनेक राज्यांमध्येही अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून उत्तर प्रदेशात 9 ते 11 नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सुरक्षेचा आढावा घेतला होता. या बैठकीत त्यांनी राज्यात मोठा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले होते

दरम्यान, उत्तर प्रदेशातील वाराणासी, प्रयागराज, आग्रा, मेरठ, लखनऊ, मथुरा, मुरादाबाद, गोरखपूर आणि अलीगडसहित सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या