बेगुसराय | भाजप नेत्याने पुष्पहार घातला म्हणून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं भाकप आणि राजदच्या कार्यकर्त्यांनी गंगाजलाने शुद्धीकरण केलं. बेगुसराय जिल्ह्यातल्या बलिया भागात हा प्रकार घडला आहे.
भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह यांनी हा पुतळा अशुद्ध केल्याचा आरोप करत भाकप आणि राजदच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याचं गंगाजलाने शुद्धीकरण केलं. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ सभा आयोजित केली गेली होती. या सभेपूर्वी गिरीराज सिंह यांनी डॉ. आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केला होता.
सभा संपल्यानंतर 24 तासांनी भाकपचे स्थानिक नेते सनोज सरोज आणि राजदचे विकास पासवान अन्य काही कार्यकर्ते पुतळ्याजवळ आले आणि त्यानंतर त्यांनी पुतळ्याचं गंगाजलाने शुद्धीकरण केलं.
दरम्यान, गंगजलाने पुतळा पूर्ण धुवून झाल्यावर त्यांनी जय भीम.. जय ज्योती अशा घोषणा दिल्या आहेत. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जलशुद्धीकरणाची देशात सध्या एकच चर्चा होत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
भाजपला मोठा धक्का! या खासदाराची खासदारकी जाण्याची शक्यता
“महाराज तुम्ही खचू नका, तुमच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र”
महत्वाच्या बातम्या-
कर्जमुक्ती हा तर केवळ प्रथमोपचार- उद्धव ठाकरे
कीर्तनकारांबद्दल माझ्या मनात सन्मानच पण अंधश्रद्धा पसरवणं दुर्दैवी- सुप्रिया सुळे
“राज्यात 8 हजार पोलिसांच्या आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार”
Comments are closed.