बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या संकटकाळात राज्यपाल कोश्यारींनी घेतला मोठा निर्णय

मुंबई | कोरोनाच्या या संकटकाळात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006  या कायद्यामध्ये  महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रासंदर्भात काही सुधारणा केल्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संव‍िधानाच्या पाचव्या अनुसूचीमधील प्राप्त अधिकारांचा वापर करुन राज्यपालांनी  दिनांक 18 मे 2020 रोजी एका अधिसूचनेव्दारे उपरोक्त कायद्याच्या कलम 6 मध्ये या सुधारणा केल्या आहेत. वन हक्क कायद्याअंतर्गत गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून वैयक्तिक किंवा सामुदायिक वनहक्काचे दावे नामंजूर झाले आहेत अशा आदिवासी बांधवांना या अधिसूचनेमुळे समितीच्या आदेशाविरोधात दाद मागता येणार आहे. सदर अधिसूचना राज्यातील पेसा क्षेत्राकरिता लागू असेल.

नव्या अधिसूचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरीय समित्या गठित करण्यात आल्या असून सदर समित्यांकडे  जिल्हा समितीच्या निर्णयांच्या विरोधात अपील करता येणार आहे.

जिल्हा स्तरीय समिती कडून वैयक्तिक व सामुदायिक वनहक्कांचे दावे मोठ्या प्रमाणात नामंजूर करण्यात येत असल्याचे राज्यपालांचे निदर्शनास आले होते. मात्र जिल्हा समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची सदर कायद्यात कुठलीही तरतूद नव्हती. अधिसूचनेमुळे बाधित आदिवासींना दिलासा मिळणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“इतकं वाटत असेल तर स्वत: येऊन परिस्थिती सांभाळा”

महत्वाच्या बातम्या-

जर मला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर…; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

छोटी राज्यपण तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत नाहीत; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सरकार भूमिका घेईल असं वाटत नाही, आता नातेवाईक मित्रमंडळींना भेटायला सुरू करा- आंबेडकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More