नवी दिल्ली | देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. आज त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. या शपथविधीवेळी राज्यसभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी ‘शेम शेम’चे नारे लगावत त्यांच्या त्यांच्या नियुक्तीला आपला विरोध दर्शवला..
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. तेव्हापासूनच काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी त्यांच्या नियुक्तीवरून भाजपवर जोरदार आसूड ओढायला सुरूवात केली. आज गोगोईंच्या शपथविधीवेळी याच विरोधाचे पडसाद संसदेत उमटलेले पाहायला मिळाले.
काँग्रेससह अन्य पक्षही माझं लवकरच स्वागत करतील. ते माझा जास्त दिवस विरोध करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे. आजच्या शपथविधीनंतर इथून पुढच्या 6 वर्षांसाठी गोगोई राज्यसभेचे सदस्य असतील.
दरम्यान, गोगोई हे एक विवादित मुख्य न्यायाधिश राहिले आहेत. तसंच त्यांनी निवृत्तीनंतर काही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, अशी टीका काँग्रसचे राज्यसभा खासदार आनंद शर्मा यांनी केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे
आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंची महाराष्ट्र सैनिकांना साद; म्हणतात…
उद्धवा, ‘पक्षपाती’ तुझे सरकार! कोरोनासंदर्भातील शासननिर्णय न मिळाल्यानं मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका
देवेंद्र फडणवीस असते तर महाराष्ट्रात आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या; राष्ट्रवादीची टीका
Comments are closed.