बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आता पुण्यातील ‘या’ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नाहीत!

पुणे | पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसतं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक नियम लागू केले आहेत. तसेच कडक निर्बंध देखील लावण्यात आले आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर रुग्ण त्यांचा जीव गमवत आहेत. मात्र या रुग्णांचे अंत्यसंस्कार करताना अनेक लोकांकडून नियमांचे पालन कटाक्षाने केले जात नसल्याचं दिसून येत आहे.

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंत्यसंस्कार करता येणार नाही, असं पुणे महापालिकेने स्पष्ट केलं आहे. याबाबतीत झालेला हा निर्णय स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर घेण्यात आला आहे. तसेच या कारणामुळे पुणे महापालिका आता अंत्यसंस्कार पर्यायी व्यवस्था शोधत असल्याचं देखील समोर आलं आहे.

वैकुंठ स्मशानभूमी ही पुण्यातील नवी सदाशिव पेठ या परिसरातील मुळा-मुठा नदीच्या जवळ आहे. या ठिकाणी रोज 80 च्या जवळपास मृतदेह आणले जातात. यासोबत येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता दिवसभरात रोज 5 हजार लोकांचे येणे-जाणे या परिसरात होते. यादरम्यान, सगळ्या लोकांकडून कोरोनाच्या नियमांचे व्यवस्थितपणे पालन होत नसल्यामुळे तेथील लोकांनी अनेक वेळा तक्रार केल्या आहेत. या कारणामुळेच पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, संबंधित ठिकाणावरील लोकसंख्या लक्षात घेऊन तेथे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भिती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुणे महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांचा अंत्यसंस्कार कुठे करावा याची माहिती रुग्णालयात देण्यात आली आहे. तसेच मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना कसलाही त्रास होणार नाही, असं अश्वासन पुणे महापालिकेने यादरम्यान दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“येत्या 40 दिवसात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागेल”

करिनाच्या धाकट्या लेकाचा फोटो चुकून झाला व्हायरल; असा दिसतो तैमुरचा लहान भाऊ

आयपीएलवर कोरोनाचं सावट; आणखी 14 कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

आयपीएलआधीच शुभमन गिलचा ट्रेलर; 35 चेंडूत काढल्या एवढ्या धावा

गुगल प्ले स्टोअरमध्ये होणार ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More