बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय जोडप्याचं व्हर्च्युअल लग्न; वऱ्हाड्यांनी दिला ऑनलाईन आशीर्वाद

नवी दिल्ली | सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. सद्यस्थितीत सर्व कार्यक्रमांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. त्यातच लग्न सोहळ्यातही बदल झाला आहे. नुकतेच भारतातील एक जोडप्याचे लग्न ऑनलाईन झूम अ‌ॅपवर पार पडले. लग्न निश्चित झाल्यावर जगभरात कोरोनामुळे टाळेबंदी झाली, त्यामुळे लग्न ऑनलाईन झालं.

अमेरिकेत राहत असलेल्या जोडप्याचे व्हर्च्युअल लग्न झाले. या सोहळ्यात ११ देशातील नातेवाईक आणि ९५ पाहुणे यात ऑनलाईन सामील झाले होते. उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे राहणारे डॉक्टर अजय आणि पूनम आगा यांचे धाकटे पुत्र अक्षत हे अमेरिकेत एका कंपनीत अभियंता पदावर नोकरी करत आहे.

पुण्यात राहणारी श्वेता अमेरिकेतील टेक्सास शहरात एमएस करत आहे. या दोघांनी जज यांना घरी बोलावलं आणि लग्नाच्या सर्व विधी पार पाडल्या. दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवाराने या क्षणाचा ऑनलाईन आनंद घेतला आणि त्यांना आशीर्वाद दिला.

हे लग्न अमेरिका आणि भारतातील अशा दोन्ही विधींनी पार पडले. अमेरिकेच्या पद्धतीत मुलगा आणि मुलगी प्रतिज्ञा घेतात आणि मग त्यानंतर एकमेकांना अंगठी घालतात. तसेच भारतीय संस्कृतीप्रमाणे वरमाला आणि कुंकू लावून लग्न विधीप्रमाणे पार पडले.

महत्वाच्या बातम्या-

दिल्ली शहरात तब्बल १००० इलेक्ट्रिक बसला मिळणार सबसिडी!

पहिल्याच सिनेमात सलमानसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीला मिळालं नाही यश, योगा टीचरसोबत केलं लग्न

….तर पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देईन- गुलाम नबी आझाद

काँग्रेस अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर संजय राऊत म्हणाले…

“काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More