बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील मृत्यू तांडव थांबेना! विरारच्या रुग्णालयात भीषण आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू

मुंबई | दोन दिवसांपूर्वीची नाशिकची ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना आता वसईच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. विरार पश्चिम याठिकाणी विजय वल्लभ या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागली आहे.

याठिकाणी एकूण 17 रुग्ण अडकल्याची माहिती मिळाली होती. मात्र लेटेस्ट अपडेट नुसार याठिकाणी 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या अतिदक्षता विभागात अचानक रात्री 3 च्या सुमारास लागली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं असून पोलिसांकडून याठिकाणी मदतकार्य करण्यात आलं.

रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यासाठीही युद्धपातळीवर हालचाली करण्यात आल्या. एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.

थोडक्यात बातम्या-

बंगळुरुचा विजयी चौकार, राजस्थानवर 10 विकेट्सने मिळवला विजय

धक्कादायक! बेड मिळाला नाही म्हणून झाडाखाली झोपले अन् पत्नीसमोर सोडला प्राण

आजपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची संपूर्ण नियमावली; वाचा एका क्लिकवर…

आरे भावा तुच जिंकलाय टॉस! टॉसदरम्यान गोंधळला विराट कोहली, पाहा व्हिडीओ

चिंता वाढली… महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More