बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीसांच्या काळात कायद्याचा धाक होता, तेव्हा…”

पुणे | पुण्यातील बिबवेवाडी येथे एकतर्फी प्रेमातुन अल्पवयीन मुलीवर वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलगी कबड्डीपटू होती. ही मुलगी कबड्डी खेळत असताना एकामुलाने सतत हल्ला केल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. मृत मुलीच्या कुटूंबाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी भेट दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुलीच्या कुटूंबियांचं सांत्वन करून 2 लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

आघाडी सरकारच्या काळात गुन्ह्यांचा दोषसिद्धी दर फक्त 9 टक्के होता. ही सर्वांकरिता चिंतेची बाब आहे. पण माननीय देवेंद्रजींच्या काळात राज्यात कायद्याचा धाक होता. तेव्हा दोषसिद्धीदर 53 टक्के होता, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पाच वर्षांमध्ये गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक होता. म्हणून आता कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज आहे.

पीडित कुटूंबियांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. कुटूंबियांना न्याय मिळावा याकरिता हा खटला फास्टट्रक कोर्टात चालवला जावा. त्यासाठी भाजपकडून एक वकील देखील देऊ, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

पीडित मुलीच्या भावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना जशी शिक्षा करण्यात येत होती तशी शिक्षा आता हत्याकांडातील आरोपीला व्हावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कुटूंबियांना धीर देत गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वोतपरि मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

थोडक्यात बातम्या-

“गरिबाच्या घरचे दिवे विझवून शनिवारवाड्याचे दिवे पेटवण्याचा प्रयत्न केलाय”

अन् भर कार्यक्रमात पुरूषाने चक्क गव्हर्नरच्या कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

“…तर शेतकऱ्यांना 4000 कोटी मिळाले असते”

‘तुम्ही प्रवाहाच्या विरूद्ध पोहता तेव्हा…’; साईलच्या आरोपानंतर क्रांती रेडकरचं प्रत्युत्तर

ड्रग्स प्रकरणावर राज्यपाल कोश्यारीचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More