बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धारावीत अवघ्या 15 दिवसांत कोविड रूग्णालय बांधून तयार, आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी

मुंबई | मुंबईतल्या घनदाट लोकवस्तीचा भाग असलेल्या धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला सोमवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली.

आरोग्यमंत्र्यांनी या रुग्णालयाला भेट देऊन त्याची पाहणी केली. अल्पावधित रुग्णालय उभे राहिले याबद्दल त्यांनी यंत्रणेनेचे कौतुकही केले. यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते

अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत हे रुग्णालय उभे राहिल्यामुळे या भागातील रुग्णांना आहे तेथेच उपचाराची सुविधा मिळणार आहे. उद्यापासून हे रुग्णालय कार्यान्वित होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. केवळ 15 दिवसांमध्ये 200 खाटांच्या या रुग्णालयाची उभारणी झाली असून तेथे प्रत्येक बेडला ऑक्सिजनची  सोय आहे. त्यामुळे ज्या कोरोनाबाधित रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला त्याला तत्काळ या सेंटरमध्ये आणून ऑक्सिजन देऊन उपचार केले जातील.

या रुग्णालयासाठी 10 डॉक्टर्स, 15 नर्स, वॉर्डबॉय तसेच पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णालात सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर थर्मल सेंसर यंत्रणा देखील असून त्याद्वारे तापाच्या रुग्णांची वेळीच तपासणी होणे शक्य होईल. कोरोनाशिवाय अन्य संशयित रुग्णांवर याठिकाणी मोफत उपचार करण्यात येतील.

कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे बऱ्याचदा श्वास रोखण्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते अशा वेळी या रुग्णांना वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर त्यांचे प्राण वाचू शकतात. स्थानिकांना आहे त्या भागातच उपचाराची सोय व्हावी यासाठी मुंबई महापालिकेमार्फत धारावीतील बस डेपो जवळ हे कोरोना आरोग्य सेंटर सुरू करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात 2361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पाहा तुमच्या भागातील कोरोना रुग्णांचा तपशील

कोरोनाचा पुण्याला दिलासा, मात्र मुंबईत आज धक्कादायक आकडा

गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

महत्वाच्या बातम्या-

‘निसर्ग’ चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज, मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘प्लॅन’!

कौतुकास्पद… आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी राज्याच्या जनतेला दिल्या 2 मोठ्या गुडन्यूज

जानकरांकडे 30 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या डॉक्टरला यासाठी मिळाला जामीन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More