बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणुकीत चंद्रकांत पाटलांच्या लेकीचा महाविकास आघाडीला दणका

धुळे | महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यातील पंचायत समिती व जि.प पोटनिवडणुकीचं बिगूल वाजलं तसेच काल या जिल्ह्यामध्ये मतदानही पार पडलं. आज सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झाली असून भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या लेकीने महाविकास आघाडीला चांगलाच दणका दिला आहे.

धुळे जि.प निवडणुकीत पाटलांची कन्या धरती देवरे यांनी महाविकास आघाडीला काॅंटे की टक्कर देत हा सामना आपल्याकडे वळवला. तसेच काल झालेल्या मतदानात 63 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. धुळे, नंदुरबार, पालघर, नागपूर वाशिम आणि अकोला या जिल्ह्यात निवडणुका झाल्या असून हळूहळू निकाल स्पष्ट होत आहे.

धुळे मतदारसंघातुन देवरे यांचा दणदणीत विजय झाल्याने त्यांच्या समर्थकांकडून एकच जल्लोष व्यक्त केला जात आहे. सकाळपासुनच या 6 जिल्ह्याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. तसेच या निवडणुकीच्या निकालानंतर सुत्रं कुणाच्या हाती जाणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा धु्ळ्यातून विजय झाला असून आता हळूहळू निकालाचं चित्र स्पष्ट होत असताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे इतर ठिकाणी नेमकं काय चित्र स्पष्ट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

आर्यन खान प्रकरणाला नवं वळण, रेव्ह पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ आला समोर

राहुल गांधींना त्यांच्याच मतदारसंघातून धक्का, आणखी एका बड्या नेत्याचा राजीनामा

प्रार्थनास्थळांचे दरवाजे उघडले पण ‘या’ लोकांना प्रवेश नाहीच; काय आहे नवी नियमावली?

देशातील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच; 7 महिन्यातील सर्वात कमी बाधितांची संख्या

पुढील 4-5 दिवस ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More