विरोधकांचा पाच वर्षात कोणताही राजकीय भूकंप नाही; मोदींचा राहुल गांधींना टोला

नवी दिल्ली | विरोधकांनी सांगितलं होतं की, देशात अनेक भूकंप येतील, पण पाच वर्षात एकही भूकंप आला नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चिमटा काढला आहे. ते बुधवारी लोकसभेत बोलत होते.

आमच्या कार्यकाळात सर्वात जास्त महिला मंत्री असलेली संसद राहिली आहे. परराष्ट्र आणि संरक्षण या महत्वाच्या पदांवर महिला मंत्री विराजमान आहेत, असं मोदी म्हणाले आहेत.

जगातील कोणत्याही देशात गेल्यावर बहुमताचे सरकार असलेला पंतप्रधान जातो तेव्हा काय प्रतिष्ठा मिळते हे मी अनुभवलं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.

बेहिशेबी मालमत्ता, अर्थिक गैरव्यवहार यासारख्या विषयावर कायदेशीर कारवाईसाठी कायद्याची निर्मिती केली. आधारची अंमलबाजावणी भाजप सरकारने केली, असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

युतीच्या चर्चेसाठी गडकरी, शहा ‘मातोश्री’चा उंबरा ओलांडणार?, हालचालींना वेग

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; मुलायम सिंग यादवांनी दिल्या शुभेच्छा

मला तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची अमित शहांवर सटकली

राष्ट्रवादी काँग्रेस विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवणार?

मोदींनी ‘अशाप्रकारे’ केले जनतेला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण- व्ही. के. सिंह

Google+ Linkedin