बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…; अभ्यासातून चिंताजनक माहिती समोर

मुंबई | कोरोना लसींबाबत एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. फायझर आणि ॲस्ट्राझेनेका लसींच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर सहा आठवड्यांनी एकूण अँटिबॉडी पातळ्या कमकुवत व्हायला सुरुवात होत असल्याचं ‘द लॅन्सेट’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटलं आहे.

अँटिबॉडी पातळी जर वेगाने घसरत राहिली तर लसींपासून मिळणाऱ्या संरक्षणाचे परिणाम कमीही व्हायला लागतील अशी काळजी वाटते, असं युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधकांचं म्हणणं आहे. तसेच फयझर लसींच्या दोन्ही मात्रानंतर अँडिबॉडी पातळी ही लक्षणीयरित्या उंचावलेली आहे, असंही यूसीएलच्या व्हायरस वॉच अभ्यासात आढळलं आहे.

ॲस्ट्राझेनेका लस भारतात कोविशील्ड म्हणून ओळखली जाते. लसीकरण झालेल्यांमध्ये अँटिबॉ़डी पातळी ही सार्स-कोव्ह2 ची बाधा व्हायच्या आधीच्या तुलनेत खूप जास्त होती, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, आतापर्यंत देशात जवळपास 45 कोटी लोकांना लशींचे डोस देण्यात आले आहेत. आता कोविशील्ड या लसीसंदर्भात सरकारनं काही खुलासे केले आहेत. मंगळवारी सरकारनं माहिती दिली की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविशील्ड 93 टक्क्यांपर्यंत प्रभावशाली आहे. या लसीमुळे मृत्यूदर 98 टक्क्यांपर्यंत कमी असल्याचं आढळून आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा ताजी आकडेवारी

‘भारत जातीवादाने नाही तर वर्णभेदानेही बाधित आहे’; मिलिंद सोमणची पत्नी अंकिता संतापली

धक्कादायक! पुणे नगरसेवकांचा भोंगळ कारभार उघड, पालिकेच्या पैशांवर सुरू आहेत ‘ही’ कामे

हाच खरा बाहुबली! डोक्यावर दुचाकी उचलणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दिलासादायक! मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More